गरजू रुग्णांना नवजीवन देण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे – प्रकाश वाले

प्रदेश काँग्रेसच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन नगरसेवक विनोद भोसले यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 72 नागरिकांचे रक्तदान

सोलापूर (तालुका क्राईम रिपोर्टर वैदपाशा तडमुड) – महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून आज प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस व नगरसेवक विनोद धर्मा भोसले मित्र परिवार व युवक काँग्रेस च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिराचे उद्दघाटन छत्रपती शिवाजी महाराज व काँग्रेस चे माजी अध्यक्ष स्व. धर्मा भोसले यांच्या पुतळ्याच्या पुजन शहर अध्यक्ष प्रकाश वाले, सोमपा गटनेते चेतन नरोटे, उपायुक्त धनराज पांडे, शहर कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार यांच्या हस्ते करण्यात आली.

महाराष्ट्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यामुळे काँग्रेस पक्षाने कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करावे असे आवाहन केले होते त्या आवाहनाला प्रतिसाद देत आज प्रदेश काँग्रेस च्या कार्याध्यक्षा आमदार प्राणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात 72 नागरिकांनी रक्तदान केले.

यावेळी प्रास्ताविक करताना नगरसेवक विनोद भोसले म्हणाले की कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सोलापुरातील रक्तपिढीमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्याचप्रमाणे उन्हाळा आणि कोरोना लसीकरणामुळे रक्तदानाचे प्रमाण घटले आहे. परिणामी गरजु रुग्णांचा जीव टांगनीला लागले आहे वेळेवर रक्तपुरवठा न झाल्यास रुग्ण दगावु शकतो म्हणुन आज रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. गरजु रुग्णांना नवे आयुष्य देण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोना लसीकरण करण्याअगोदर रक्तदान करावे असे आवाहन यावेळी नगरसेवक विनोद भोसले यांनी केली आहे.

यावेळी तुकाराम महाराज देवकते, सुभाष शिंदे महाराज, युवक काँग्रेस अध्यक्ष बाबा करगुळे, NSUI जिल्हा अध्यक्ष गणेश डोंगरे, अमोल भोसले, अनुसूचित जाती विभाग जिल्हा अध्यक्ष गौरव खरात, परिवहन सदस्य तिरूपती परकीपंडला, प्रशांत पल्ली, अशोक कलशेट्टी, मनोज बागडी, राजासाब शेख, भट्टाड शेटजी, राज सलगर, विनोद क्षीरसागर, शाहू महाराज, विकास राठोड, रूपेश गायकवाड़, बसवराज कोळी, सुभाष सलगर, प्रशांत मोहोरकर, नागेश सोलंनकर, अंबादास संजीवनी, संजय गायकवाड उपस्थित होते. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी अमोल भोसले मित्र परिवार व गणराज तरुण मंडळ, बाल हनुमान भजनी मंडळ यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here