- जखमीवर बार्शी येथे उपचार सुरू
- दोन महिलांसह पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल
- उप विभागीय पोलिस अधिकारी राठोड यांची घटणा स्थळी भेट
धाराशिव (जिल्हा प्रतिनिधी सुरेश बागडे) – परंडा तालुक्यातील घारगाव येथे किरकोळ कारणा वरून तलवारीने ह्ल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला .या हल्यात तुषार लटके हा गंभीर जखमी झाला हि घटणा शुक्रवार दि ३० एप्रिल रोजी सकाळी घारगाव येथे घडली जखमीस बार्शी येथील जगदाळे हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी प्रकाश लटके यांची मुलगी व जावईमध्ये पटत नसल्याने मुलगी वडीलाकडे राहत आहे जावई यास त्यांचा चुलत पुतण्या तुषार लटके फोन फरून भडकवतो असा संशय घेऊन धमकी दिल्याने मी तुमच्या जावयाला कश्याला फोन करू असे सांगण्यासाठी दि ३० रोजी तुषार लटके हा चुलत चुलता प्रकाश लटके यांना समजून सांगण्यासाठी गेला असता अमर लटके याने तुला ठार मारतो असे म्हणत तलवारीने हल्ला केला व डोक्यावर वार मारून गंभीर केले व तुषारचा भाऊ विशाल लटके यांना अमर लटके , आकाश लटके , प्रकाश लटके वंदना लटके , तृप्ती धनाजी चौधरी यांनी मारहाण केली .
विशाल लटके यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न करणे व भारतीय हत्यार कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .आरोपी . अमर लटके , आकाश लटके , प्रकाश लटके यांना अटक करण्यात आली आहे . घटनास्थळी उप विभागीय पोलिस अधिकारी यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलिस उप निरिक्षक बनसोडे करीत आहेत.






