लोकसंघर्ष मोर्चा कोव्हीड केअर सेन्टर व रामेश्र्वर कॉलनीतील मजुराना केले गहू, तादूळ, सॅनिटायझर व मास्कचे वाटप
जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – दिनांक १ मे २०२१ शनिवार रोजी स्व . निखिलभाऊ खडसे यांच्या ८ व्या स्मृती दिनानिमित्त नाथ फाऊंडेशन जळगाव या संस्थेच्या वतीने जळगाव येथे लोकसंघर्ष मोर्चा कोव्हीड केअर सेन्टर , रामेश्र्वर काँलणी येथे गोरगरीब मंजूर नागरिकांना चार पोते गंहु , दोन पोते तांदूळ , २०० माँक्स , २०० सँनिटायझर बाँटल जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा अघ्यक्ष श्री रविंद्रभैय्या पाटील , मा . आमदार डॉ . गुरुमुखजी जगवाणी , मा . आमदार श्री मनिषदादा जैन यांच्या हस्ते गंहु , तांदूळाचे वाटप करण्यात आले
यावेळी लोकसंघर्ष मोर्चा कोव्हीड केअर सेन्टरचे सचिव श्री संचिनभाऊ धांडे , सहसंचिव भरतभाऊ कांरडीले , राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अशोकभाऊ पाटील , नाथ फाऊंडेशनचे अघ्यक्ष अशोक लाडवंजारी , उपंअघ्यक्ष सुनिलभैय्या माळी , डॉ . अभिषेक ठाकूर , महानगर सरचिटणीस सुशीलकुमार शिंदे , युवा मोर्चा सरचिटणीस विशाल देशमुख , गौरव डांगे यांच्या उपस्थित वाटप करण्यात आले. स्व . निखिलभाऊ खडसे यांना दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून श्रध्दांजली वाहण्यात आली






