भाजप अल्पसंख्याक मोर्चातर्फे भव्य रक्तदान शिबीर संपन्न; मुसळधार पावसातही ५६ दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भाजप

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रमोद रुले) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप अल्पसंख्याक मोर्चा जळगाव जिल्हातर्फे आज गोलाणी मार्केट परिसरात एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला मुसळधार पाऊस असतानाही रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, दिवसभरात एकूण ५६ जणांनी रक्तदान केले.

या रक्तदान शिबिराचा शुभारंभ जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदारांनी अल्पसंख्याक मोर्चाच्या या स्तुत्य सामाजिक उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.

या प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष दीपक परदेशी, उदय भालेराव, पितांबर भावसार, अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष परवेज पठाण आणि उपाध्यक्ष वसीम खान, जहांगीर खान यांची प्रमुख उपस्थिती होती. हे शिबीर ‘रेड प्लस रक्तपेढी’च्या सहकार्याने अत्यंत यशस्वीपणे पार पडले. पावसामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांवर मात करत नागरिक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले योगदान दिले.

शिबिरादरम्यान भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नवीन निवडी जाहीर करण्यात आल्या. आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते जिल्हा सचिव इस्माइल शेख, उपजिल्हाध्यक्ष जब्बार शेख, अफसर शेख, अब्दुल हमीद यांच्यासह जमीर नागोरी, ॲडव्होकेट शरीफ शेख, इरफान शेख यांना निवडीची नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

हा सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी अल्पसंख्याक मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते जहांगीर खान, संजय वराडे, मोहसीन पठाण, शोएब शेख, फहीम खान, सेजील पठाण, हसन शेख, आमीर सैय्यद, जमीर नागोरी, फिरोज पठाण, राम वराडे, आसीफ पठाण, योगेश माळी, शैलेश परदेशी, रफीक ठेकेदार, जमील शेख यांच्यासह इतर सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here