जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर शरद चव्हाण) | महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
या जयंतीनिमित्त जिल्हा पक्ष कार्यालय, आकाशवाणी चौक येथे स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला जळगाव जिल्हा ग्रामीण अध्यक्ष प्रमोद पाटील व महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या हस्ते हार घालून व फुले अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
अभिवादनाचे कार्यक्रम संपल्यानंतर पक्ष कार्यालयाजवळ विविध प्रकारच्या २१ वृक्षांचे रोपण (वृक्षारोपण) करण्यात आले. त्यानंतर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जाऊन रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. तसेच श्रीराम माध्यमिक विद्यालय येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व दप्तरांचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन, नियोजन व प्रास्ताविक मनोगत जिल्हा सरचिटणीस वाय. एस. महाजन सर यांनी केले.
या सर्व कार्यक्रमाला जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) ग्रामीण जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील, महानगर जिल्हा अध्यक्ष अशोक एस. लाडवंजारी, प्रदेश सरचिटणीस ईजाजभाई मलिक, जिल्हा समन्वयक विकासदादा पवार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. मंगलाताई पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाअध्यक्ष मजहरभाई पठाण, युवक महानगर जिल्हाअध्यक्ष विनायक पाटील, माजी नगरसेवक राजुभाऊ मोरे, माजी नगरसेवक तथा जिल्हा सरचिटणीस सुनिल भैय्या माळी, जिल्हा उपाध्यक्ष किरणभाऊ राजपूत, ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष गिरीश सांगळे वंजारी, सुहास चौधरी, संजय जाधव, जिल्हा उपाध्यक्ष मोहसीनभाई शेख, कार्यालय मंत्री सतिश चव्हाण, फराह शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







