पुणे येथे अनैतिक संबंधातून जावयाने केला सासूचा खून

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – बिबवेवाडी परीसरात शेळके वस्तीत रोजच्या भांडणाला कंटाळून जावायाने सासूचा गळा आवळून खून केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी जावई आसिफ दस्तगीर आत्तार (वय २६ रा. शेलकेवस्ती बिबवेवाडी) यास बिबवेवाडी पोलीसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासू व जावई यांच्यात होत असलेल्या भांडणाला कंटाळून जावयाने सासू अनारकली महंमद तेरणे (वय ४५ रा. शेलकेवस्ती बिबवेवाडी) हिचा ओढणीने गळा आवळून खून केला. ही घटना काल शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जावई आसिफ दस्तगीर आत्तार, सासू अनारकली महंमद तेरणे आणि मेव्हनी मौलाली मंजलापुरे हे सर्व मूळ कर्नाटक राज्यातील रहिवासी आहेत. व्यवसाय उद्योगांच्या अनुषंगाने काही दिवसांपासून हे सर्व जन बिबवेवाडीत शेळके वस्तीत राहत होते. मात्र त्याने आपल्या बायकोला कर्नाटकात सोडले होते. जावाई असिफ हा मिळेल ती कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता.

दरम्यान घरात किरकोळ कारणावरून त्याचे पत्नी आणि सासू यांच्याबरोबर दररोज भांडण व्हायचे. मात्र, शनिवारी दि.१ मे रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास त्यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाली. यात आरोपीने रागाच्या भरात सासूला मारहाण करत ओढणीने तिचा गळा आवळून खून केला.

यानंतर मेव्हनी मौलाली मंजलापुरे (वय ३१ रा. शेलकेवस्ती बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी दिली आहे. त्याप्रमाणे घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास पथकातील पोलीस अधिकाऱ्यांना तपासाचे आदेश दिले. तपास पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी असिफ अत्तार याला अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश उसगांवकर करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here