जिल्हास्तरीय ऑनलाईन लोकशाही दिनात 11 तक्रार अर्ज दाखल

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेला ऑनलाईन लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

आज झालेल्या ऑनलाईन लोकशाही दिनात एकूण 11 तक्रार अर्ज दाखल झालेत. यामध्ये प्रामुख्याने तहसिलदार जळगाव कार्यालयाकडे 5, तहसिलदार चाळीसगाव 4, तहसिलदार जामनेर 2 याप्रमाणे तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत. नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी सर्व विभागांच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या. तसेच सदरच्या तक्रारी ज्या विभागाशी संबंधित असतील त्यांचेकडे तक्रार निवारणासाठी पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी दिलेत. यावेळी प्रलंबित प्रकरणांचाही आढावा घेऊन नागरीकांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश दिले. आज प्राप्त झालेलया अर्जांवर संबंधित विभागांनी कार्यवाही करुन पुढील लोकशाही दिनात पूर्तता अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री राऊत यांनी दिले.

जिल्हास्तरीय लोकशाही दिनास निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांचेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तर तालुक्याच्या ठिकाणाहून उपविभागीय अधिकारी व तहसिलदार ऑनलाईन उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here