वर्ग शिक्षकाने केले विद्यार्थिनींशी अश्लिल चाळे; गुन्हा दाखल

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – येथील हडपसर परिसरातील एका नामांकित शाळेतील वर्गशिक्षकाने विद्यार्थिनीशी अश्लिल चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात शिक्षकावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हडपसर पोलीस ठाण्यात याबाबत एका विद्यार्थिनीने तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार शिक्षक संजय साळुंके याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नोव्हेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० दरम्यान ही घटना घडली होती. आरोपीने विद्यार्थिनीला मोबाइल देऊन तिच्याशी जवळीक साधली. तसेच, शाळेत देखील विविध कारणे काढून तो विद्यार्थिनीला बोलवून अंगास स्पर्श करत होता. मुलीने हा प्रकार आता कुटुंबियांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता.

हडपसर पोलिसांनी तक्रारीच्या आधारे संजय साळुंके या शिक्षकावर गुन्हा दाखल केला आहे. त्याने इतरही विद्यार्थिनींच्या अंगाला हात लावून त्यांच्या मनास लज्जा निर्माण होईल, असे वर्तन केले का, याचा तपासही हडपसर पोलीस करत आहेत. याप्रकरणी अद्याप अटकेची कारवाई करण्यात आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here