कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादर) – राज्याच्या विविध भागांत गेल्या अनेक दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडत असल्याचं पहायला मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात वीज थेट इलेक्ट्रिसिटीच्या ट्रान्सफॉर्मरवर कोसळली. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
कोल्हापूरात सायंकाळच्या सुमारास अचानक वीजांचा कडकडाट सुरू झाला आणि प्रतिभानगर परिसरात असलेल्या वीजेच्या ट्रान्सफॉर्मरवर वीज कोसळली. ही घटना एका व्यक्तीच्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. वीजेच्या ट्रान्सफॉर्मवर वीज कोसळल्याने या परिसरातील वीज पूरवठा खंडित झाला आहे.
राज्यातील विविध भागांत पुढील तीन दिवस अवकाळी पाउस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. काही ठिकाणी मेघग्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी विजांच्या कडकटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
गेल्या चार-पाच दिवसांपासून राज्यातील विविध भागांत अवकाळी पाऊस पडत आहे. अवकाळी पावसामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर रविवारी राज्याच्या विविध भागांत वीज कोसळून तब्बल 7 जणांचा मृत्यू झाला होता. तर पाच जनावरे सुद्धा दगावली होती. तर सोमवारी सुद्धा सातारा जिल्ह्यात वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती.






