जळगाव (निलेश पाटील) – कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले व कुणाल संजय जडे यांच्याकडून जळगावातील सर्व पोलिस स्टेशन्सचे सेनिटायजशन करण्यात आले. यात शहर पोलिस स्टेशन,रामानंद पोलिस स्टेशन, जिल्हापेठ पोलिस स्टेशन व एस .पी.कार्यालयात सेनिटायजशन करण्यात आले. या प्रसंगी शिक्षक भारतीच्या महिला आघाडी अध्यक्षा शितल जडे, भावेश ठाकुर, महेश ठाकुर (अध्यक्ष सोशल मीडिया सेल भा.ज.प),अतुल बोंडे, हर्षाली पाटील उपस्थित होते. जनमत प्रतिष्ठान व कुणाल जडे यांच्याकडून जळ्गावातील सर्व शासकीय कार्यालये, हॉस्पिटल्स व शैक्षणिक कार्यलयाचे सेनिटायजशन करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. कुणाल संजय जडे हा रायसोनी कॉलेजचा डिप्लोमा विद्यार्थी आहे. आजच्या ह्या तडफडार युवकाने समाजकार्यात मोलाचे योगदान देत जनमत प्रतिष्ठानमार्फत या कोरोना महामारीचा नायनाट करण्यात खारीचा वाटा उचलला आहे ही गोष्ट कौतुकास्पद आहे.








