लग्नाचे आमिष दाखवून त्रिकुटाचा अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर सामूहिक अत्याचार करणाऱ्या त्रिकुटाच्या विरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी तिघा तरुणांना बेड्या ठोकल्या आहे. विशेष म्हणजे अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याने हा सामूहिक अत्याचाराचा प्रकार स्वमोर आलेला आहे.

वर्तकनगर पोलिसांनी सामूहिक अत्याचार प्रकरणी अटक केलेल्या आरोपींमध्ये आकाश कदम (21), विकी करोटिया (22) आणि सागर करोटिया यांचा समावेश आहे. या प्रकरणाबाबत वर्तकनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित युवती आणि आरोपी आकाश कदम हे दोघे एकाच वर्तकनगर परिसरात राहावयास आहेत. चार ते पाच महिन्यापूर्वीच पीडितेची आणि आरोपी आकाश याची ओळख झाली होती. ओळखीनंतर त्यांच्यात जवळीक झाली. जास्त जवळीकीने आपुलकी आणि त्याचे रूपांतर हे प्रेमात झाले. प्रेमाच्या ओघात आरोपी आकाश याने मुलीला लग्नाचे अमिष दाखविले. त्यानंतर एक दिवस संधी साधून आरोपी आकाश याने तिला आपल्या घरी बोलावले. घरी आलेल्या पीडित सोबत शरीर संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर आकाशने आपले मित्र विकी आणि सागर यांनाही घरी बोलावले. त्या दोघांनीही तरुणीवर अत्याचार केला.

त्यानंतर तिघांनीही वेळोवेळी पीडितेला बोलावून त्याच्यावर अत्याचार केले. अखेर पीडित मुलगी ही गरोदर राहिली. पीडित गरोदर राहिल्याने हा सामूहिक अत्याचाराचे प्रकरण समोर आले. सादर प्रकारची माहिती पीडितेच्या कुटुंबियांना मिळताच त्यांनी आरोपी आकाश, विकी आणि सागर यांच्या विरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. वर्तकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर तिघांनाही अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here