जमावाचा पोलिसांवर हल्ला; दोन पोलिस जखमी

बुलडाणा (प्रतिनिधी) – जमावाने दगडफेक करत पोलिसांवर हल्ला केल्याची घटना लोणार तालुक्यात घडली. चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपाला पोलिस अटक करून नेत होते. त्यावेळी पोलिसांच्या पथकावर एका जमावाने दगडफेक केली. या हल्ल्यात दोन पोलिस गंभीर जखमी झाले तर पोलिसांच्या गाडीचेही नुकसान झाले आहे.

लोणार तालुक्यातील खापरखेड घुले या गावात बक-यांच्या चोरीचा प्रकार घडला होता. या गुन्ह्यातील आरोपाला अटक करण्यासाठी शनिवारला सकाळी पोलिसांचे पथक या गावात गेले होते. संशयित आरोपाला ताब्यात घेऊन जात असतांना खापरखेड घुले गावातील एका जमावाने आरोपीच्या अटकेला विरोध केला. त्यानंतर जमावाने पोलिसांच्या गाडीवर जबर दगडफेक केली.

या घटनेत दोन पोलिस जखमी झाले आहेत. याप्रकरणी लोणार पोलीसांनी जमावातील १४ लोकांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातली आठ आरोपींना अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here