कोरोनाचे नियम पायदळी तुडवून बीडमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त तरुणांनी डीजेच्या तालावर धरला ठेका

औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – कोरोनाचे नियम पायदळी तुडवून, बीडच्या माजलगाव तालुक्यातील शिमरी पारगावमध्ये, छत्रपती संभाजी महाराजांची जयंती काही अतिउत्साही तरुणांनी डीजे लावून धूमधडाक्यात साजरी केली.

यावेळी हातात तलवार घेऊन सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत तरुणानी गाण्यावर चांगलाच ठेका धरला होता. एकीकडे बीड जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह शहरी भागात मोठ्या प्रमाणात कोरोणाचे रुग्ण आढळून येत असताना, अशा पद्धतीने सार्वजनिक कार्यक्रम घेणे चुकीचे आहे. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे पोलिसांकडून अद्याप यावर काहीच कारवाई केली गेली नाही. यामुळं पोलीस प्रशासन अशा अतिउत्साही तरुणांवर गुन्हा दाखल करणार का? असाच प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.

बीड जिल्ह्यात दररोज बाराशेेेे ते पंधराशे नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. म्हणून जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना संपूर्णतः बंदी असल्याचं सांगितलं आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद असताना बीडच्या माजलगावमधील पारगाव येथील काही अतिउत्साही तरुणांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त थेट गावाच्या चौकात डीजे लावून ताल धरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here