दोंडाईचा नंदुरबार चौफुलीवर हाँटेल जयस्वालसमोर ट्रक व मोटरसायकलचा भीषण अपघात

अपघातात शहादा येथील एकाचा जागीच मृत्यू तर महिला गंभीर जखमी

दोंडाईचा (विशेष प्रतिनिधी) – आज दिनांक १८ मे मंगळवार रोजी संध्याकाळी ७.३० वाजता दोंडाईचा नंदुरबार चौफुलीवर हाँटेल जयस्वाल समोर ट्रकने मागुन मोटरसायकला दिलेल्या जोरदार धडकेत मोटरसायकल चालक जागीच ठार झाला असुन त्याची पत्नी गंभीर जखमी झल्याची घटना घडली आहे.

याबाबत घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की, दोंडाईचा येथील माहेर असलेली व सध्या शहादा येथे राहत असलेली बागवान समाजाची मुलगी सायरा जफर बागवान( वय३०)आपल्या पती जफर गुलाब बागवान(वय ४५) यांच्या सोबत शहादा येथुन आपल्या माहेरी दोंडाईचा कडे होन्डा पँशन क़पनीची क्रमांक Gj-5-fj-1347 निघाले व ७.३० वाजता दोंडाईचा- नंदुरबारवर पोहचले असता मागुन येणाऱ्या ट्रक क्रमांक Gj-21-w-9253 ने जोरदार धडक दिली असता मोटरसायकल चालक जफर बागवान जागीच चेंदामेंदा होऊन ठार झाले. तर त्यांची पत्नी सायरा बागवान गंभीर जखमी असल्यामुळे उपजिल्हा रुग्णालयाची १०८ क्रमांकाची गाडी बोलवली मात्र उपजिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर तातडीने सायरा बागवान यांना धुळे जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले.

यावेळी घटनास्थळावरून ट्रक चालक पळून जात असताना, चालकाला जनतेने बेदम मारहाण करण्यात आली. मात्र लगेच दोंडाईचा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष लोले,पोलीस उपनिरीक्षक सचीन गायकवाड हजर झाल्याने ट्रक चालकाचे प्राण वाचले व पोलिस ठाण्यात ताब्यात घेण्यात आले. तसेच रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here