मनसे सैनिकांकडून शिर्डी पोलिस कर्मचारी यांना अनोखी भेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिर्डी पोलीस स्टेशन व शिर्डी ट्राफिक पोलीस यांना फेस शिल्डचे वाटप

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) – आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शिर्डी शहर च्या वतीने शिर्डी पोलीस स्टेशन व शिर्डी ट्राफिक पोलीस यांना फेस शिल्डचे वाटप करण्यात आले.

दिवसेंदिवस कोरोना चा धोका वाढतच चालला आहे. त्यामुळे रात्रंदिवस नागरिकांच्या आरोग्यासाठी झटणारे डॉक्टर, आरोग्य व पोलीस कर्मचारी यांचा जवळुन संपर्क येत आहे. त्यांच्याही आरोग्याची काळजी आपण का घेऊ नये या हेतूने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिर्डी पोलिस स्टेशन व शिर्डी ट्राफिक पोलिस कर्मचारी यांना फेस शिल्ट चे वाटप करण्यात आले आहे.

shirdi-police-station

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी आज शिर्डी पोलिस स्टेशन मधील सर्व पोलिस बांधवांना फेस शिल्ट वाटप करुन उपक्रम राबविला आहे. पोलिस बांधव हे पुर्णपणे फिल्ड वर कार्यरत असतात गर्दीशी त्यांचा संपर्क आधिक येतो अशावेळी त्यांनी काळजी घेणे जास्त गरजेचे असते. म्हणूनच फेस शिल्ड चा पावर करन संसर्गाचा धोका कमी करता येतो ही बाब लक्षात घेवुन आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शिर्डी शहराचे अध्यक्ष सौरभ विठ्ठल हाडवळे यांच्या वतीने पोलिस स्टेशन कर्मचारी यांना फेस शिल्ड वाटप केले

यावेळी सर्व मनसे सैनिक तसेच मनसेचे स्नेह वाडेकर, आभिषेक वाकमारे, महेंद्र काटकर, विनायक शिंदे, अमोल जाधव, शिवम डांगे, महेश चौधरी, योगेश निरभवने, मयुर आडागळे, रुषी सोनवणे, किरण भागवत, विठ्ठल जाधव, सागर त्रिभुवन, तेजस सुरासे व सर्व मनसे सैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here