मुंबई (संपादक सुनिल पाटील) – सामाजिक उपक्रमात नेहमीच सहकार्य करणारी फिल्म इंडस्ट्रीज मधील अग्रगण्य संस्था वेस्टर्न इंडिया फिल्म एंड टीवी प्रोड्युसर्स एसोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र राज्य, मुख्यमंत्री ‘कोविड सहायता निधी” फंडासाठी २,५०,०००/- दोन लाख पन्नास हजार रुपयांची देणगी देण्यात येणार आहे.
त्याचसोबत एसोसिएशनच्या गरजू सदस्यांना प्रत्येकी रुपये ३,०००/- तीन हजार आर्थिक सहाय्य करण्यात येत आहे. गेल्यावर्षी झालेल्या कोरोना लॉकडाऊन मध्ये वेस्टर्न इंडिया फिल्म एंड टीवी प्रोड्युसर्स एसोसिएशनच्या कार्यकारणीने सुमारे २१ लाखांचा निधी वाटप केला असून समाजिक कार्यात व नैसर्गिक आपत्तीत नेहमीच सेवाभागी कार्य एसोसिएशन करीत आली आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष संग्राम शिर्के व जनरल सेक्रेटरी दिलीप दळवी यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे.






