मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – संगीतकार अच्युत ठाकूर यांचे मंगळवारी दि. १८ रोजी कोरोनाने निधन झाले. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.
गांधर्व महाविद्यालयातून ‘संगीत विशारद’ झाल्यानंतर त्यांनी संगीत क्षेत्रात करिअर केले. १९८३ ला ‘श्री रामायण’ हा त्यांनी पहिला चित्रपट संगीतबद्ध केला. पुढे त्यांनी ‘पैज लग्नाची’, ‘घे भरारी’, ‘आता लग्नाला चला’, ‘सर्जा राजा’, ‘मर्मबंध’, ‘चिमणी पाखरं’, ‘, ‘सत्ताधीश’, ‘गृहलक्ष्मी’, ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’, ‘तुझा दुरावा’, ‘विठाबाई’ अशा अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले आहे.
कोरोनाची दुसरा लाट धुमाकूळ गालत आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. यामध्ये अनेक कलाकारांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये काही कलाकारांनी कोरोनावर मात केली. तर काही जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.






