छोटा राजनची पुतणी असल्याचे सांगत ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या महिलेस अटक

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) – छोटा राजन या गँगस्टरची पुतणी असल्याचे सांगत जीवे ठार मारण्याची धमकी देऊन ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक-२ने अटक केली आहे.

प्रियदर्शनी प्रकाश निकाळजे (वय-३६ वर्षे, रा. अनिता अपार्टमेंट, जांभूळकर चौक, वानवडी) असे अटक केलेल्या महिला आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यातील इतर आरोपी धीरज साबळे व मंदार वाईकर यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी लष्कर पोलीस स्टेशन येथे दि. १४ मार्च २०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून या गुन्ह्यातील मुख्य आरोपी प्रियदर्शनी निकाळजे ही फरार झाली होती.

तिचा शोध घेत असताना खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार सचिन अहिवळे यांना वरील आरोपी महिला ही वानवडी परिसरात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त, उप आयुक्त, गुन्हे-२ चे सहायक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-२ ने जांभूळकर चौक, वानवडी येथून तिला अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here