लॉकडाऊनच्या काळात पुणे महानगर पालिकेने दिलेल्या आयकार्डचा गैरवापर

कलर झेरॉक्स करून शासनाची केली जात आहे फसवणूक

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) – कोरोनाच्या काळात निधन झालेल्यांचे अंत्यविधीसाठी पुणे महानगर पालिकेने पुणे शहरातील काही सामाजिक संघटनांची नियुक्ती केली आहे.

त्या सामाजिक संघटना व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मृत्यू पावलेल्या कोरोना रूग्णांवर अंत्यसंस्कार केले जात आहे. त्यासाठी पुणे महानगर पालिकेतील आरोग्य विभागाने नाव नोंदणी केलेल्या सामाजिक संघटना व त्यांचे कार्यकर्त्यांना आयकार्ड दिले आहे. परंतु आरोग्य विभागाने दिलेल्या आयकार्डचा गैरवापर होताना दिसत आहे.

लॉकडाऊनच्या काळात पोलीसांनी धरू नये यासाठी काहींनी नामी शक्कल लढवली आहे. या आयकार्डांची कलर झेरॉक्स काढून बोगस आयकार्ड बनवून याचा गैरवापर करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here