पावसाळ्यात गावात सुरळीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी पाणीपुरवठा सभापतींनी आढावा बैठकीत केले आवाहन

विविध उपाययोजनांसाठी सभापतींनी घेतला आढावा

दोंडाईचा (प्रतिनिधी) – येणाऱ्या काळात गावात सुरळीत पाणीपुरवठा व्हावा व पाऊसाळ्यात नैसर्गिक येणाऱ्या विविध अडचणी व त्याच्यांवर मात करून जनतेला स्वच्छ, सुरळीत पाणीपुरवठा कसा करता येईल,यासाठी पाणीपुरवठा सभापती श्री प्रवीणभाऊ महाजन यांनी नगरसेवकांसह कर्मचाऱ्यांची नगरपालीकेत आढावा बैठक घेऊन आवाहन केले.

आज दिनांक २० मे २०२१ गुरूवार रोजी दुपारी १२.०० वाजता दोंडाईचा वरवाडे-नगरपालीकेत पाणी पुरवठा सभापती प्रवीण महाजन यांनी लवकरच सुरू होणाऱ्या पाऊसाळ्याच्या पाश्वभुमीवर पाणी पुरवठा विभागाची नुकतीच आढावा बैठक घेतली. बैठकीत येणाऱ्या काळात करोना परिस्थिती असल्यावर देखील गावातील जनतेला पाणीपुरवठा दैनंदिन सुरळीत कसा देता येईल व पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होणे, वादळ व हवेमुळे वृक्ष कोलमडून वीज तारा व खांबे पडून पाणी पुरवठा खंडीत होणे, तापी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे गढूळ पाणी येणे, पाईपलाईन लिकेज होणे, नवीन पाणी पुरवठा योजना पुर्णत्वास नेणे या आणि ह्यासारख्या निगडीत अनेक विषयांवर चर्चा,सल्ला-मसलत करून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात तसेच पाणी पुरवठा खंडित झाल्यास दोंडाईचा शहराला तात्काळ पर्यायी व्यवस्था करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात याव्यात अशा सुचना पाणी पुरवठा सभापती श्री प्रवीणभाऊ महाजन यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.

यावेळी बैठकीला पाणी पुरवठा सभापती प्रवीण महाजन यांच्यासह आरोग्य सभापती प्रतिनिधी कृष्णा नगराळे, माजी पाणी पुरवठा सभापती संजय तावडे, माजी आरोग्य सभापती जितेंद्र गिरासे, नगरसेवक हितेंद्र महाले,किशनभाई दोधेजा, मा.स्विकूत नगरसेवक गिरधारीलाल रूपचंदाणी,शहर चिटणीस मनोज सोनवणे,अनिल सिसोदिया,पंकज चौधरी, छोटू ढोले, पाणी पुरवठा विभागाचे अभियंता जावरे, नंदकुमार वाडीले, कमलेश काळे, दीपक जाधव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here