गावठी दारू विक्री करणारी महिला पोलिसांच्या ताब्यात

lady-arrested

पुणे (क्राइम रिपोर्टर शंकर संकपाळ) – बारामती तालुक्यातील तांदुळवाडी गावात गावठी हातभट्टीची दारू जवळ बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले आहे. गीता अशोक अडागळे असे आरोपी महिलेचे नाव असून याबाबत बारामती तालुका पोलीस स्टेशन येथील महिला पोलीस कॉन्स्टेबल आशाराणी जाधव यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गीता अडागळे या महिलेने तांदुळवाडी येथील तिच्या राहत्या घरात बेकायदेशीरपणे देशी दारू व गावठी हातभट्टीची दारू ठेवली होती. तिच्या घरातून ७,४८८/- रु. किमतीच्या टँगो पंच नावाच्या देशी दारूच्या १४४ बाटल्या, ७२८/- रु. किमतीच्या सिमला संत्रा नावाच्या १४ बाटल्या व १७५०/- रु. किमतीची ३५ लिटर हातभट्टीची तयार दारू असा एकूण ९९६६/- रु. किमतीचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.

तिच्या विरुद्ध बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ढवाण करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here