गुटखा विक्री करणाऱ्या दोघांना अटक

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) – शासनाने बंदी घातलेली असतानाही बेकायदेशीरपणे गुटखा विक्री करणाऱ्या दोघांना वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याजवळून ७७,७८१/- रु. किमतीचा गुटखा व होंडा सिटी कार जप्त करण्यात आली आहे.

सवईराम कोजारामजी देवाशी (वय-२६ वर्षे, रा. साईबाबा मंदिराजवळ, शिरगाव, पुणे) व प्रकाश गोपाराम देवाशी (वय-२४ वर्षे, रा. एस बी पाटील स्कूलजवळ, रावेत, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध वाकड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, दि. २१ मे रोजी ११.३० वा.च्या सुमारास थेरगाव येथील शेल पेट्रोल पंपासमोर आरोपी सवईराम देवाशी व प्रकाश देवाशी हे दोघे एका होंडा सिटी कारमधून गुटखा हा तंबाखूजन्य पदार्थ आरोग्यास अपायकारक असल्याचे माहीत असूनही विक्री करण्यासाठी घेऊन जात होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना पकडले.

त्यांच्याकडील ७७,७८१/- रु. किमतीचा गुटखा व ज्या कारमधून गुटखा नेत होते ती सुमारे ४,५०,०००/- रु. किमतीची कार असा एकूण ५,२७,७८१/- रु. चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याबाबत वाकड पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक मधुकर मल्लिनाथ कोळी यांनी फिर्याद दिली आहे.पुढील तपास वाकड पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक शिंगारे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here