स्वजन फाउंडेशन ठाणेतर्फे इम्मुनिटी बूस्टर किटचे वाटप

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – करोना काळात सरकार सोबत अनेक सामाजिक संस्थांनी मदतीसाठी खारीचा वाटा स्वीकारला. त्यापैकीच स्वजन फाउंडेशन ठाणे शहर. या संस्थे तर्फे आज श्री श्री तत्व आयुर्वेदिक इम्मुनिटी बूस्टर किटचे ठाण्यातील महिला रिक्षाचालक, घरकाम करणाऱ्या स्त्रिया, व स्वच्छता कर्मचारी महिलांना ठाणे शहर पोलीस डीएसपी अविनाशजी अंबुरे यांच्या हस्ते सदर किट चे वाटप करण्यात आले.

immunity-kit-distribution-by-swajan-foundation

या कार्यक्रमाप्रसंगी अत्यावश्यक सेवा ज्यांनी वाहतूक शाखेस दिली ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष श्री सतीश बनसोडे महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशियन सहसंपादक- बुलंद पोलीस टाइम्स तसेच महिला अध्यक्ष सौ.तृप्ती पाटील, वाहतूक विभाग महिला अध्यक्ष सौ.प्रीती खाणेकर, महीला अत्याचार समिती अध्यक्ष सौ.शोभना ओवाळ, अबोली महिला रिक्षा संघटना अध्यक्ष सौ सरोज पोटफोडे यांची प्रमुख उपस्थिती होत्या.

lady-rixa-driver-of-thane

सध्या कोरोनाच्या काळात स्वतःची प्रतिकार शक्ती वाढवत आजाराला दूर राखणं एवढेच आपल्या हाती आहे. तसेच पावसाळा सुद्धा तोंडावर आलाय सर्दी ,ताप, खोकला असे आजार या दिवसात हमखास डोकं वर काढतात . अशा आजारात डॉक्टरांकडे जाणंही सध्या अडचणीच ठरतय..या महिला रिक्षा चालक ,स्वच्छता दूत, घरकाम करणाऱ्या स्त्रिया रोज कामानिमित्त अनेकांच्या संपर्कात येतात.. त्यातही या रिक्षाचालक महिला तर कधीकधी अगदी कोरोना रूग्णांच्या ही संपर्कात येतात..

कामाच्या व्यापामुळे वेळच्यावेळी जेवण व चौरस आहार घेणे त्यांना शक्य होत नाही. याचा परिणाम त्यांच्या प्रतिकार शक्तीवर होतो. त्यामुळेच समाजाबरोबर कुटुंबातही प्रत्येकाच्या जवळ जाणाऱ्या या स्त्रियांना आतून सशक्त बनवणं फार गरजेचं आहे. म्हणूनच या प्रतिकार शक्ती वर्धक औषधांचे वाटप स्वजन फाऊंडेशनच्या माध्यमातून आज करण्यात येत आहे.

swajan-foundation

स्वजन फाऊंडेशनने या कोरोनाच्या काळात गेले वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम राबवले .त्यापैकीच आजचा हा उपक्रम .यावेळी सर्वांना आयुर्वेदिक औषधांच्या पाकिटांच वाटप करण्यात आलं .डॉक्टर सौ कविता राक्षे व सचिन राक्षे यांनी मोलाचा मदतीचा हात दिला.. यावेळी संस्थेच्या वतीने साधना जोशी, योगेश जोशी ,संतोष पाटील, विष्णू खाजणवाडकर, सुनिता गावकर ,सुनील गावकर ,संध्या झंझाड, निशा कारंडे ,व उत्तम पवार यांनी काम पाहीलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here