अंगावर थुंकल्याचा राग आल्यामुळे 32 वर्षीय महिलेचा खून

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – अंगावर थुंकल्याचा राग आल्यामुळे रुणाने महिलेचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी आरोपीला अटक करून धनकवडीतील महिलेच्या खुनाची उकल केली आहे.अविनाश विष्णू साळवे (वय 27 ,रा. चैतन्य बियरबार, धनकवडी ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर कल्पना घोष (वय 32, रा. धनकवडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

सहकारनगर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पना घोष मूळची पश्चिम बंगालची होती. ती धनकवडीतील एका सदनिकेत एकटी राहत होती. शनिवारी सकाळी ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसताच रहिवाशांनी सहकारनगर पोलिसांना माहिती दिली होती. या खून प्रकरणी पोलिसांनी चैतन्य बियर बारमध्ये काम करणाऱ्या अविनाश साळवेला ताब्यात घेतले होते.

चौकशीत त्याने कल्पना दारू घेण्यासाठी आल्यानंतर वारंवार शिवीगाळ करीत होती. 2 दिवसांपूर्वी कल्पना बियर बारमध्ये दारु घेण्यासाठी आली होती. त्यावेळी तिने अविनाशला शिवीगाळ करून त्याच्या अंगावर थुंकली होती. त्याचा राग सहन न झाल्याने त्याने कल्पनाचा खून केल्याची कबुली दिली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here