साताऱ्यात अश्लील फोटो दाखविण्याची धमकी देऊन विवाहितेवर अत्याचार

सातारा (प्रतिनिधी दिनेश लोंढे) – तालुक्यातील एका गावातील महिलेशी शारीरिक संबंध ठेवून त्याचे फोटो काढून ते महिलेचा पती, मुलगा, नातेवाइकांना दाखविण्याची धमकी देऊन विवाहितेवर वारंवार अत्याचार केल्याची खळबळजनक घटना साताऱ्यात उघडकीस आले आहे. याप्रकरणी स्वरूप महादेव गुजर (वय ५०, रा. हिरण्या प्राइड अपार्टमेंट, तामजाईनगर, सातारा) याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्वरूप गुजर याने हा प्रकार २०१८ ते २१ मे २०२१ या कालावधीत केला आहे. पीडित महिलेशी शारीरिक संबंधाचे फोटो त्याने काढले. नंतर या कालावधीत सातत्याने हे फोटो तिचा पती, मुलगा, नातेवाइकांना दाखविण्याची धमकी देत वारंवार तिच्याशी जबरदस्तीने संबंध ठेवले.

शारीरिक संबंधास नकार दिल्यानंतर गुजर याने महिलेच्या गळ्य़ाला चाकू लावून तिच्याकडून बँकेचा एटीएमचा पिन क्रमांक घेऊन तिच्या बँक खात्यातून १ लाख ५० हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर आणखी पैसे घेतले, असे सर्व मिळून दोन लाख रुपये धमकी देऊन काढून घेतले असल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी स्वरूप गुजर याला अटक करण्यात आली असून, या गुन्ह्याचा अधिक तपास उपनिरीक्षक ए. बी. वाघमारे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here