परमिट बार फोडून विदेशी दारूवर चोराचा डल्ला

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) – शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील एक परमिट बार फोडून चोरट्यांनी ७० हजार रुपयांच्या विदेशी दारूच्या बाटल्या चोरून नेल्या आहेत. ही घटना दि. २२ मे सकाळी १०.०० वा. ते दि. २३ मे सकाळी १०.०० वा. च्या दरम्यान हॉटेल बंद असताना घडली आहे.

याबाबत निलेश पोपटराव भुजबळ (वय-३२, रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, पुणे) यांनी फिर्यादी दिली असून, शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निलेश भुजबळ यांचे शिक्रापूर तळेगाव रोडवर एन.पी. फॅमिली रेस्टॉरंट अँड परमिट बार नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलच्या पाठ्मागाच्या दरवाज्याचा कडी कोंडा तोडून चोरट्यांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला. तसेच हॉटेलमधील स्टॉकरूमचा कडीकोंडा तोडून आतील विदेश दारूचे बॉक्स व त्यातील बॉटल्स असा एकूण ७०,०००/- रु. चा माल चोरून नेला आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शेडगे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here