अभिनेत्री शुभांगी गायकवाड अभिनय क्षेत्रात काम करून आपले स्वप्न पूर्ण केले

मुंबई (प्रतिनिधी स्नेहा उत्तम मडावी) – शुभांगी गायकवाड हिला लहानपणा पासून कलेची आवड , अभिनय क्षेत्रात काम करून आपले स्वप्न पूर्ण करायचे अशी तिची जिद्द होती.

चार वर्ष भरपूर परिश्रम करून अनेक फिल्म, ऍड फिल्म, शॉर्ट फिल्म,अल्बम सॉंग च्या माध्यमातून अभिनयाचा ठसा उमटविला. 2018साली कोल्हापूर मध्ये शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार प्राप्त झाला. शुभांगी च्या कलेला जनु शाब्बासकिच मिळाली.shubhangi

त्यानंतर शुभांगी ची ॲक्टिंग आणि मॉडेलिंग क्षेत्रात कामगिरी पाहून एका न्युज पेपर च्या वतीने तिला एक्सलेन्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. 2018-2019 यावर्षी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात कलारत्न हा मानाचा पुरस्कार मिळाला. 2020 मध्ये तानाई उद्योग समूहाच्या ब्रँड ॲम्बेसिडर आणि संचालिका म्हणून शुभांगी ची निवड झाली.

 

actress-shubhangi

मराठी चित्रपट सृष्टीत अत्यंत कमी कालावधीत शुभांगी ने आपल्या नावाचा ठसा उमटविला टिप्स मराठी या YouTube चॅनल वर पाखरु गाणे नुकतेच प्रदशीत झालें त्यानंतर T.Vचैनल 9X झकास आणि संगीत मराठी, झी वाजवा यावर प्रदर्शित झालेले पाखरू हे सॉंग महाराष्ट्राला वेड लावणारे सुपरहिट ठरले.

 

 

actress-shubhangi-gaikwad

कमी कालावधीत महाराष्ट्रभर प्रसिद्धी मिळवली पाखरू या गाण्याने शुभांगी ची जिद्द आणि मेहनत या कलेच्या माध्यमातून दिसत आहे आणि तिची कला क्षेत्रातील कामगिरी खूपच कौतुकास्पद आहे. आपल्या कसदार अभिनय व सौंदर्याच्या जोरावर आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या मराठमोळ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गायकवाड यांना मानाचा मुजरा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here