सह्याद्री प्रतिष्ठान पेणतर्फे किल्ले रत्नगडावरील दरड आपत्काल स्थिती काढण्यात आली

अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) – रायगड जिल्ह्यातील ता.पेण येथील रत्नगडावर खडकात खोदलेले पाण्याच्या एकूण चार टाके आहेत. त्या पैकी दोन टाक्यात काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात बालेकिल्यावरील दरड कोसळली होती.त्यामुळे टाके बुजले जात होते.स्थानिक सायमाळ ग्रामस्थ आणि सह्याद्री प्रतिष्ठान पेण यांनी ही कामे पावसाळ्यापूर्वी तत्काळ करण्याचे ठरविले. त्यानुसार सलग दोन रविवार स्वच्छता मोहिमा घेऊन या संदर्भातील सर्व माहिती वन-विभाग रायगड आणि पुरातत्व विभागाला देण्यात आली असून गडाला पर्यटनदृष्ट्या महत्वप्राप्त करण्याच्या उद्दिष्ट ठेऊन या संदर्भातील प्रास्तव सबंधित विभागांना दुर्ग संवर्धन विभागामार्फत देण्यात आला आहे. अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष श्री.समीर म्हात्रे यांनी दिली.

ratnagadगडावर स्थानिक सायमल ग्रामस्थ आणि महालमिऱ्या ग्रुप ग्रामपंचायत यांच्या सहकाऱ्याने गडावरील स्थानिक पातळीवर तसेच मुंबई आणि पनवेल विभाग सदस्य यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन पेण विभगाने गडाच्या मोहिमेस सुरुवात केली. सध्या गडावरील तटबंदी,बुरुज अवशेष मातीत गाडले गेले होते. तर पाण्याच्या टाक्यात दरड कोसळली होती ती स्वच्छ करण्यात आली. तर येत्या पुढील मोहिमेत सूचना/इतिहास फलक,दिशा दर्शक,स्थळ दर्शक,गडावरील मूर्तीशिल्पाला शेड बसविण्यात येईल. सह्याद्री प्रतिष्ठान पेण विभागा मार्फत पुढील काळात रत्नगड आणि मीरगड या गडांची कामे हाती घेण्यात आली असून ती कामे लवकरच पूर्ण होत्तील आणि पेण तालुक्यातील या ऐतिहासिक गडांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होईल. असे पेण विभाग अध्यक्ष श्री.रोशन टेमघेरे यांनी सांगितले.

shyadri-patishthan-pen

इतिहास-रायगड जिल्ह्यातील गडकिल्ल्यांपैकी पेण तालुक्यातील ईतिहास असे मीरगड आणि रत्नगड असे दोन किल्ले आहेत. महालमिऱ्या डोंगराच्या दक्षिण आणि उत्तर दिशेला हे किल्ले वसलेले आहेत. प्राचीन व्यापरी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी येथे या किल्ल्यांचा महत्वाची भूमिका होती. शिवकाळात या गडांना फार महत्व होते इ.स.१६६२ मध्ये मुघल सरदार नामदार खान याने पेण वर हल्ला केला तेव्हा तेव्हा मिरगड परिसरात झालेल्या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांनी या लढाईत सहभाग घेतला होता. त्यावेळी रत्नगडावरी किल्लेदार कावजी कोंढालकर यांनी या गडावरून महत्वाची भूमिका निभावली होती.मुघलांचा कट त्यांनी हाणून पडला होता.इ.स.१७४० मध्ये हा भाग तुळाजी आंग्रे यांच्या ताब्यात होता नानासाहेब पेशव्यांनी तुळाजीस कैद करून हा परिसर आपल्या ताब्यात घेतला.जावजी मराठे यांच्याकडे हा परिसर २९ मार्च १७४० पर्यंत होता. त्यानंतर हा किल्ला इ.स.१८१८ मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेला. पेण मधील ऐतिहासिक वारसा जतन संवर्धनाचे काम सह्याद्री प्रतिष्ठान पेण विभगाने घेतले असून शिवप्रेमींनी या सहभाग घ्यावा असे आवाहनही पेण विभागाकडून करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here