अहमदनगर (प्रतिनिधी कृष्णा साठे) – नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथे वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी मा. ना विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या प्रयत्नातून स्व. मा. आमदार वकीलराव लंघे पाटील फाउंडेशन शिरसगाव संचलित &मोफत कोविड सेंटर सुरु केले आहे. त्यात तपासणी ते उपचारापर्यंतच्या उपाययोजना करण्यात येनार आहेत.
या कोविड सेंटरचे उद्घाटन ह.भ.प महंत शिवाजी महाराज देशमुख, व मुंगसे महाराज व मा.ना.विठ्ठलराव लंघे पा.जि.प.स.डॉ.तेजश्रीताई लंघे उपस्थित मा.पंचायत समिती सदस्य संजय खरे सर, प्रदीप भाऊ ढोकणे पा, सरपंच छगन खंडागळे,उपसरपंच दत्तू नाना पोटे, डॉ. डिंबर, डॉ. तावरे, संतोष काळे , नवनाथ देशमुख,वसंतराव देशमुख चोपडे सर, रामभाऊ शिंदे सर, विठ्ठल काळे सर, शाहजी गडेकर, सरपंच विनोद ढोकणे, बाबासाहेब आगळे, राजेंद्र मते, आशिफ पठाण, मंगेश निकम, बापू देशमुख, संजय लंघे, प्रविण लंघे, गणेश लंघे, हरिभाऊ लंघे,सुधीर चव्हाण,नवनाथ साळुंके, बिरबल दरवडे व आदी मान्यवर उपस्थित होते.






