शिर्डी येथे भक्ताचे ₹2,510 असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले जमा; गणेश गोरडे यांचा सत्कार

शिर्डी

शिर्डी (प्रतिनिधी तुषार महाजन) | शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या परिसरात साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे कर्मचारी श्री. गणेश गोरडे यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी एक नंबर गेटजवळील PRO लॉकर परिसरात त्यांना एका भक्ताचे पाकीट आढळून आले. सदर पाकिटामध्ये ₹2,510 इतकी रोख रक्कम होती.



पाकीट सापडल्यानंतर श्री. गणेश गोरडे यांनी कोणताही मोह न ठेवता ते पाकीट तत्काळ संरक्षण विभागातील श्री. होन साहेब यांच्याकडे प्रामाणिकपणे जमा केले. त्यांच्या या कृतीतून सामाजिक बांधिलकी, कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणाचा आदर्श निर्माण झाला आहे.
गणेश गोरडे यांच्या या प्रामाणिकपणाची दखल घेत त्यांचा पोलीस अधीक्षक श्री. रोहिदासजी माळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार, व्हाईस चेअरमन पोपटराव कोते, तसेच संचालक मंडळ, सचिव, सहसचिव आणि सोसायटी कर्मचारी रुंद यांनी अभिनंदन व कौतुक केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्री. गणेश गोरडे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले. साई संस्थान परिसरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कर्तव्यमी बजावताना दाखवलेली अशी प्रामाणिकता ही निश्चितच कौतुकास्पद असून, इतरांसाठीही प्रेरणादायी असल्याचे उपस्थितांनी सांगितले. भक्तांच्या वस्तू व मौल्यवान साहित्य सुरक्षितपणे परत मिळवून देण्याच्या दृष्टीने अशा प्रामाणिक कृतींमुळे साई संस्थानची सेवा आणि कर्मचारी वर्गावरील विश्वास अधिक दृढ होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here