माण (प्रतिनिधी निलेश अडसूळ) | संपूर्ण महाराष्ट्रात कोठेही न आढळणारी अशी स्पर्धा बिदाल येथे बैलाची तोरण मारण्याची शर्यत नागपंचमी सणानिमित्त आयोजित केली होती. या शर्यतीमध्ये शिवाजी नथुराम जगदाळे यांचा बाजा, गौरव जाधव यांचा प्रधान, दौलत सोपान जगदाळे यांचा सारंग, गणेश सुतार विसापूरकर यांचा श्री गणेश, आणि विश्वनाथ सर्जेराव जगदाळे यांची चिमणी गाय या पाच बैलाने सामुदायिक 18 फुटावरील तोरण मारून प्रथम क्रमांकाचे 51 हजार रुपयांचे पारितोषक व आकर्षक ट्रॉफी देण्यात आली .
द्वितीय क्रमांकाचे 31 हजार रुपयांचे पारितोषिक संजय मोतीलाल गांधी यांचा अर्जुन, प्रमोद किसन ढोक यांचा राजा, महादेव रामचंद्र बोराटे यांचा पोपट, गजानन हरिश्चंद्र इंगळे यांचा पोपट, गणेश लावंड खात गुण, अक्षय शिवाजी जगदाळे यांचा पक्ष, आकाश तांदळे यांचे दिलबरा गाय आठ बैल मालकांना सामुदायिक रित्या देण्यात आले तर तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस 14 फुटावरील तोरण मारलेल्या 27 बैल मालकांना देण्यात आले.
या स्पर्धेमध्ये गोंदवले,म्हसवड विसापूर , गोडोली, खात गुण, शिंदी, आंधळी, दहिवडी, कलेढोण, दहिवडी, बिदाल या गावावरून बैल आले होते. एकूण 76 बैलांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता सुरुवातीला तोरण 14 फुटावर बांधण्यात आले होते त्यामध्ये 76 पैकी 40 बैलांनी तोरण शिवल होते त्यानंतर तोरण 16 फुटावर बांधण्यात आले राहिलेल्या 40 महिला पैकी 13 बैलांनी हे सोळा फुटाचे तोरण मारले त्यानंतर तिसऱ्या फेरीसाठी तोरण अठरा फुटावर बांधण्यात आली हे 18 फुटाचे तोरण 13 पैकी पाच बैलांनी मारले .
त्यानंतर पंच कमिटीने अठरा फुटावरील तोरण मारलेल्या पाच बैलांना सामुदायिक 51 हजाराचे बक्षीस वितरण करण्यात आले तर 16 फुटावरील तोरण मारलेल्या आठ बैलांना द्वितीय क्रमांकाचे 31 हजार रुपयांचे बक्षीस सामुदायिक रित्या देण्यात आले तर 14 फुटावरील तोरण मारलेल्या 27 बैलांना 21 हजाराचे सामुदायिक बक्षीस देण्यात आले. ही स्पर्धा पाहण्यासाठी जिल्ह्यातून तसेच तालुक्यातून अनेक मान्यवर उपस्थित होते समलोचक म्हणून किशोर इंगवले, धनंजय जगदाळे यांनी काम पाहिले तर नेमून दिलेल्या पंचानी आपली कामगिरी चोक बजावली. सनई डफडे , पिपाणी याच्या सुंदर स्वरांमध्ये हा कार्यक्रम दिवसभर सुरू होता. या स्पर्धेचे प्रक्षेपण लाईव्ह असल्याने संपूर्ण राज्य परदेशात लोक ही स्पर्धा पाहत होते अनेकांनी ऑनलाईन बक्षीसही विजेत्या बैल मालकांना दिले.
या स्पर्धेमध्ये प्रथमच मोठ्या प्रमाणात गाईंचा सहभाग दिसला शंकर चिरमे यांच्या गाईने 14 फुटावरील तोरण मारले .16 फुटावरील तोरण आकाश तांदळे शिंदी यांच्या दिलबर यांनी मारले तर अठरा फुटावरील तोरण विश्वनाथ जगदाळे यांच्या चिमणीने शिवले होते विशेष म्हणजे बैलाची तोरण मारण्याची असणारी स्पर्धा यामध्ये पहिला फेरा व शेवटचा फेरा हा गाईचा झाला. या तोरण मारण्याच्या स्पर्धेत सलग तीन वर्ष प्रथम क्रमांक मध्ये येत असलेल्या शिवाजी नथुराम जगदाळे यांच्या uh बाजाने चौथ्या वर्षीही पहिल्या फेरीमध्ये 18 फुटावरील तोरण मारून डोळ्याचे पारणे फेडले. यावेळी बाहेरगावावरून येणाऱ्या बैल मालकांना बैलासाठी टोप देण्याची व्यवस्था कमिटीने केल्यामुळे कोणाची गैरसोय झाली नाही त्यामुळे ही स्पर्धा उत्साहात पार पडली.
गेली 44 वर्ष अखंडित बिदाल येतील तोरण मागण्याची शर्यत अखंडितपणे चालू असून ह्या शर्यतीच्या निमित्ताने कै, साहेबराव जगदाळे यांच रांगड समालोचन कै, ज्ञानदेव चिरमे यांची शिस्त कै, धोंडीराम जगदाळे कै, निवृत्ती जगदाळे यांची स्पर्धा टिकवण्यासाठी असणारी धडपड निश्चित आठवण आल्याशिवाय राहत नाही.
बिदाल येथील शिवाजी राव नथुराम जगदाळे यांचा पेडगाव हिंदकेसरी चा मानकरी शर्यत क्षेत्रातील नामवंत नाव असणारा बाजा यांनी निघाली येथील तोरण मारण्याच्या शर्यतीत सलग चार वर्ष प्रथम क्रमांकाचा मान मिळवला आणि हजारो रुपयांची बक्षीस जिंकली.
Home पश्चिम महाराष्ट्र सातारा बिदाल येथील तोरण मारण्याची शर्यत : बाजा, प्रधान, सारंग, गणेश यांच्यासह विश्वनाथ...







