यावल तालुक्यात आशा सेविकेचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान.

यावल ( सुरेश पाटील ) – कोरोना योद्धा म्हणून यावल तालुक्यातील चुंचाळे येथील आशा सेविका सौ.जयश्री प्रकाश चौधरी यांचा सन्मान यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी निलेश पाटील यांच्या हस्ते आणि तहसीलदार जितेंद्र कुंवर, पंचायत समिती सभापती सौ पल्लवी चौधरी, सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष पुरूजीत चौधरी, जिल्हा परिषद तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हेमंत बराटे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
सन्मान कोरोना योद्धाचा
कोरोना वीर योद्धा २०२० पुरस्कार जि.प.शिक्षण व क्रीडा सभापती रविद्र पाटील यांच्या वाढदिवसा निमीत्त प्रमुख पाहुण्याच्या हस्ते स्विकारतांना चुंचाळे येथील कर्तव्यदंक्ष आशा स्वंयमसेवीका सौ.जयश्री प्रकाश चौधरी यावेळी जि.प.सदस्य शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र पाटील (छोटु भाऊ), यावल तहसिलदार जितेंद्र कुंवर,यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे,यावल प.स.सभापती पल्लंवीताई चौधरी,डांभुर्णी सरपंच पुरुजीत चौधरी,यावल तालुका वैद्यकीय अधिकारी हेमंत बर्हाटे , साकळी येथील सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील,पत्रकार चंद्रकांत नेवे,किरण माळी,गोकुळ तायडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here