अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) – रायगड जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे, अलिबाग विधानसभा मतदार संघाचे आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी पाडवादेवी देहेन मेढेखार या रस्त्यावर देहेन गावाजवलील ५० वर्षा पूर्वी बांधलेल्या खचलेल्या पुलांची पाहणी केली.
यावेळी त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना पूलाचे काम लवकरच लवकर सुरु करण्याचे आदेश दिले. तसेच जिल्हा नियोजन फंडातून निंधी उपलब्ध करून देण्यात येईल असे ग्रामस्थांना सूचित करण्यात आले.

सदर कामांची पाहणी करतांना शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी शिवसेना उपतालुका प्रमुख प्रकाश पाटील श्रीगाव ग्रामपंचायत सदस्य विकास निळकर सदस्य प्रीती पाटील सदस्य श्रंधा निळकर व ग्रामस्थ ह.भ.प गंगाधर पाटील उल्हास पाटील ह.भ.प प्रेमनाथ राऊत उपस्थित होते.






