आरे दुग्ध वसाहतीच्या सीईओच्या घरात साडेतीन कोटींची रोकड सापडली

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – आरे दुग्ध वसाहतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड यांच्या घराची अॅण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने झडती घेतली असता घरात तब्बल तीन कोटी 46 लाख 10 हजार इतकी रोकड मिळून आली. दोन दिवसांपूर्वीच राठोड यांना 50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते.

दिनकर (नाव बदललेले) यांचे आरे वसाहतीत घर असून त्यांना घराची दुरुस्ती करायची असल्याने त्यांनी त्यासाठी नथू राठोड यांच्याकडे परवानगी मागितली होती. मात्र परवानगी देण्यासाठी राठोड यांनी त्यांच्या कार्यालयातील शिपाई अरविंद तिवारी यांच्याकरवी 50 हजारांची मागणी केली होती. मात्र लाच द्यायची नसल्यामुळे दिनकर यांनी अॅण्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली होती. त्यानंतर दिनकर यांच्याकडून तिवारी यांनी 50 हजार घेतल्यानंतर राठोड आणि तिवारी यांना पकडण्यात आले होते.

दरम्यान, अॅण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने नथू राठोड यांच्या घराची झडती घेतली. त्या झडतीत घरामध्ये तब्बल तीन कोटी 46 लाख 10 हजारांची रोकड सापडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here