शेतात शौचाला गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार; नग्नावस्थेतच लटकवले विजेच्या खांबाला

gangrape

समस्तीपूर (बिहार) – जिल्ह्यात अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. विभूतीपूर तालुक्यातील चकहबीब गावातील एका महिलेसोबत सामूहिक बलात्कार करून नंतर तिला नग्नावस्थेत विजेच्या खांबाला लटकविण्यात आले आहे. पीडित महिलेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने गावकरी संतापले असून त्यांनी सात कामगारांना बंदी बनवले होते.

पीडित महिलेच्या घरी लग्न होते. त्यामुळे बँड वाले व तंबू वाले कामगार आले होते. लग्नाच्या दुसऱ्या दिवसी सदर महिला शौचासाठी शेतात जात असताना काही लोकांनी तिचे अपहरण केले.त्यानंतर दूर शेतावर नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. ते हैवान एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी पीडित महिलेला बेदम मारहाण केली. त्यामुळे महिला बेशुद्ध पडली. त्यानंतर त्यांनी तिला नग्नावस्थेत विजेच्या खांबाच्या आधारे फासावर लटकवले.

काही वेळात गावकरी जागे झाल्यानंतर सदर महिलेला असे लटकलेल्या अवस्थेत पाहून सर्वांना धक्का बसला. लोकांनी तत्काळ तिला खाली उतरवले. त्यानंतर तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तिला दलसिंहसराय येथील मोठ्या रुग्णालयात हलविले आहे.

सदर महिलेच्या घरी लग्नकार्यासाठी आलेल्या कामगारांनी हा प्रकार केल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी सात कामगारांना बंदी बनवले होते. मात्र नंतर पोलिसांनी मध्यस्थी करत त्यांची सुटका केली असून त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलीस त्या कामगारांची चौकशी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here