दोंडाईचा रोटरी सिनियर्सचे रवि पाटील यांची अँसिस्टन्ट गव्हर्नर पदी नियुक्ती

१जुलै ते ३० जुन पर्यंत रवी पाटील पदभार स्विकारतील…

दोंडाईचा (विशेष प्रतिनिधी) – रोटरी डिस्ट्रिक्ट ३०६० च्या अँसिस्टन्ट गव्हर्नर पदी रोटरी सिनियर्सचे रविंद्र सिताराम पाटील यांची निवड रोटरीचे नुतन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो.संतोष प्रधान यांनी १जुलै २०२१ ते ३० जुन २०२२ यावर्षाकरीता करण्यात आली आहे.

श्री रवि पाटील हे रोटरी सिनियर्सचे संस्थापक सदस्य असुन त्यांनी रोटरी सिनियर्सच्या अध्यक्षपदाची धुरा देखील सांभाळून अनेक सामाजिक उपक्रमात मोठ्या हिरारीने सहभाग घेतला आहे. त्यांच्या ह्याच कार्याची दखल घेऊन त्यांना रोटरीच्या अँसिस्टन्ट गव्हर्नर पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

त्यांच्या निवडीबद्दल रोटरीचे अध्यक्ष चेतन सिसोदिया ,सचिव राजेश माखिजा ,जेष्ठ सदस्य डॉ. मुकुंद सोहनी ,राजेश मुणोत, सुरेश जैन, सौ आशाताई टोणगांवकर आदींसह सर्व सदस्यांनी अभिनंदनचा वर्षाव करत समाधान व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here