सोलापूर (तालुका क्राईम रिपोर्टर वैदपाशा तडमुड) – दिनांक २६ मे २०२१ माजी केंद्रीय मंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, स्व विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमीत्त सोलापूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी वतीने काँग्रेस भवन सोलापूर येथे शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
यावेळी कॉंग्रेस शहर कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, नगरसेवक हाजी तौफिक हत्तुरे, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, माजी महापौर अलकांताई राठोड, ब्लॉक अध्यक्ष अरुण साठे, बाबुराव म्हेत्रे, युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, VJNT अध्यक्ष भारत जाधव, तिरुपती परकीपंडला, शकील मौलवी, प्रमिला तुपलवंडे, सुमन जाधव, प्रियांका डोंगरे, श्रद्धा हुल्लेनवरू, वीणाताई देवकते, मुमताज तांबोळी, शोहेब हत्तुरे, आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना शहर अध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले की स्व. विलासराव देशमुख हे सरपंच ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास अत्यंत दैदिप्यमान आणि प्रेरणादायी आहे. आपल्या कर्तृत्वातून महाराष्ट्राला नवी दिशा देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. मा. सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्याशी अत्यंत घनिष्ठ संबंध होते. महाराष्ट्रभर स्व. विलासराव देशमुख व सुशीलकुमार शिंदे यांना दो हंसोका जोडा म्हणून ओळखले जाते. अश्या थोर नेत्यास विनम्र अभिवादन.






