औरंगाबाद येथे देवळाईच्या चौकात तृतीयपंथीयांस २० ते २५ जणांची जबर मारहाण

औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – करमाड टोलनाक्यावर पैसे मागून पोट भरणाऱ्या तृतीयपंथीला देवळाई चौकात पाठलाग करुन २० ते २५ जणांनी जबर मारहाण केली. ही घटना रविवारी रात्री साडेदहा वाजता घडली. आम्हाला गुरु मानून आमच्यासोबत रहा असे म्हणत इतर किरकोळ कारणावरुन जूना वाद उकरत ही मारहाण करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी केवळ तक्रार दाखल करुन घेतली, असा आरोप तृतीयपंथीयांनी केला आहे.

या प्रकरणात समोर आलेल्या माहितीनुसार, तृतीयपंथी आलिया शेख, आणि सनम शेख या करमाड टोल नाक्यावर पैसे मागून आपला उदरनिर्वाह भागवतात. दोघीही रविवारी रात्री करमाडहून औरंगाबादकडे रिक्षाने येत होत्या. दरम्यान बाळापूरपासून २० ते २५ संशयितांनी त्या दोघींचा पाठलाग सुरु केला.

दोघींना देवळाई चौकात थांबविले, आणि आलियाला मारहाण केली. दरम्यान तिची साथीदार सनम (सना) आणि रिक्षाचालकाने पळ काढल्याने त्यांना मार बसला नाही. ‘सुहाना शेख’ से पंगा लेते हो क्या असे म्हणत मारहाण केल्याचेही धन्नो शेख म्हणाल्या. तसेच पोलिसांकडून चांगली वागणूक न मिळाल्याचाही आरोप धन्नो शेख हिने केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here