पुण्यात फार्महाऊसवर दिवसाढवळ्या सुरु होता डान्सबार; पोलिसांनी बारगर्लसह आरोपींना घेतले ताब्यात

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – भोर तालुक्यातल्या केळवडे गावात एका फार्महाऊसवर दिवसाढवळ्या डान्सबार होता. या डान्सबार पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली. पुणे सातारा हायवेजवळच्या फार्महाऊसवर पोलिसांनी छापा मारला.पुण्यातल्या ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी बारगर्लसह आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

धक्कादायक म्हणजे मुंबई ठाण्यातल्या मुलींना खासगी फार्महाऊसवर आणून आरोपींचा धांगडधिंगाणा सुरु होता. डान्स पार्टीतील लोकं पुण्यातील रहिवासी असल्याची माहितीही समोर आली आहे. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here