पुणे महानगरपालिकेमध्ये सातवा वेतन आयोग लागु करण्यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे त्वरीत सादर करावा

पुणे मनपा आयुक्तांकडे विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांची मागणी

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) – पुणे महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांना ७ वा वेतन आयोग लागू करणेसंबंधी मा. मुख्य सभेने दिनांक १० मार्च, २०२१ रोजी ठराव पारित केलेला आहे. सदर ठरावाच्या अनुषंगाने मनपा प्रशासनाकडून मे. राज्य शासनाकडे ७ व्या वेतन आयोगाचा प्रस्ताव पाठविणेबाबतची कार्यवाही संथगतीने चालू आहे. या अनुषंगाने मा. मनपा पदाधिकारी यांनीही बैठका घेवून प्रशासनास वारंवार सुचना केल्या आहेत. मनपा प्रशासनाकडून कर्मचा-यांना ७ व्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी लागू करण्यास विलंब होत असल्याने कर्मचा-यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरलेला आहे. याचाच एक भाग म्हणुन अधिकारी व कर्मचा-यांनी काळ्या फिती लावून काम करीत आहे.वास्तविक पाहता कोरोना आल्यापसुन पुणे मनपाचे कर्मचारी व अधिकारी यांनी जीव मुठीत घेवून काम केले आहे. कोरोना काळात काम करत असताना कोरोनाची लागण झाल्यामुळे मनपा कर्मचा-यांच्या मृत्यु झाला आहे.

केंद्र शासन, महाराष्ट्र शासन व राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना सातवा वेतन आयोग लागू झाला असून पुणे महापालिकेस अद्यापही लागू नाही. पुणे महानगरपालिका आस्थापनेवर एकूण अंदाजे १६५०० अधिकारी/कर्मचारी कार्यरत आहेत. ७५०० कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्रशासनाने महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेप्रमाणे किमान वेतन दर लागू केले आहेत. तथापि, कायम कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार वेतन निश्चितीकरण केलेले नाही.

कर्मचा-यांमध्ये असंतोष निर्माण झाल्यामुळे कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात असुन कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आंदोलन झाल्यास पुणेकरांना वेठीस धरल्यासारखे होईल व याची संपुर्ण जबाबदारी व प्रशासनाची असेल याची आपण गांभीर्याने नोंद घ्यावी. तरी सातवा वेतन आयोग लागु करण्यासाठीचा प्रस्ताव मा.राज्य शासनाकडे मनपाच्या वतीने मान्यतेसाठी त्वरीत सादर करण्यात यावा अशी मागणी दिपाली धुमाळ यांनी केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here