प्रतापगढ (उत्तरप्रदेश) – येथील जेठवारा पोलीस ठाण्याजवळ एका गावात रविवारी रात्री एका विवाहात वधूने लायसन्सच्या रिव्हॉल्वरने अगोदर गोळ्या झाडल्या, नंतर वराला वरमाला घातली. सजलेल्या वधूने फायरिंग केल्याचा व्हिडिओ सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला.
याबाबत समजलेली माहिती अशी की, जेठवारा पोलीस ठाण्यापासून सुमारे तीन किलो मीटर अंतरावर एका गावात रविवारी रात्री वरात आली होती. जयमालसाठी आकर्षक मंच सजवण्यात आला होता. रात्री सुमारे 11 वाजता वधू घरातून जयमालसाठी घरातून निघाली तेव्हा सोबत चालणार्या महिला मंगल गीत गात होत्या. वधू मंचाच्या पायर्या चढू लागली तेव्हा जवळ असलेल्या व्यक्तीने तिच्या हातात रिव्हॉल्वर दिले. वधूने मंचार चढण्यापूर्वीच रिव्हॉल्वरने हर्ष फायर केला त्यानंतर वरमाला घातली. वधूच्या रिव्हॉल्वरने गोळीबार केल्यानंतर उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.
दुसर्या दिवशी सोमवारी हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला. परिसरात वधूने रिव्हॉल्वरने फायर करणे चर्चेचा विषय झाला. मात्र, एसओ जेठवारा संजय पांडेय यांनी विवाहात वधूने हर्ष फायरिंग केल्याबाबत माहिती देण्यास नकार दिला. त्यांनी म्हटले जर असे झाले तर लायसन्स रद्द करण्याची कारवाई केली जाईल.






