किणीत जुगार खेळताना छापा १ लाख ५८ हजाराचा मुद्देमाल जप्त

अक्कलकोट (तालुका क्राईम रिपोर्टर वैदपाशा तडमुड) – दि ३१ मे रोजी किणी ते चुंगी जाणाऱ्या रस्त्यालगत जगदंबा हॉटेलच्या पाठीमागे आंब्याच्या झाडाखाली काही लोक 52 पानी पत्त्याचा मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची खबर अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याला मिळाल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी जुगार खेळणाऱ्या लोकांवर अचानकपणे छापा टाकून त्यांच्याजवळील रोख रक्कम मोबाईल वाहन असा एकूण १ लाख ५८ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणात संशयित आरोपी संजय धनु पवार (वय ३८ रा. चुंगी), सलीम इस्माईल मुल्ला (वय ३९ रा.किणी), बाबू शामराव विटकर (वय ४१ रा सुलतानपूर ), अजित अप्पाराव पाटील (रा मुस्ती) यांच्यावर गुन्हे दाखल झाले असून १ आरोपी फरार असून इतर तिघांना नोटीस बजावली आहे. या गुन्ह्यात ४ मोटारसायकल, एक मोबाईल फोन व १६०० रुपये रोख रक्कम ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पोलीस कॉ. भीमराव खंडागळे यांनी फिर्याद दिली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार अंगद गीते हे करीत आहेत.

अक्कलकोट तालुक्यातील किणी चुंगी रोडवरील जगदंबा हॉटेलच्या पाठीमागे आंब्याच्या झाडाखाली ५२ पत्याचा मन्ना नावाचा जुगार खेळताना पोलिसांनी छापा टाकून १ लाख ५८ हजार १३० रुपये मुद्देमाल जप्त करून चौघांवर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here