ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – एका हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे या कारवाईत ठाणे क्राईम ब्रांचने दोन अभिनेत्रींना अटक केली आहे. एका खाजगी सोसायटीतील हे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू होतं. ठाणे क्राईम ब्रांचला याची माहिती मिळताच धाड टाकून ही कारवाई केली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ठाण्यातील एका खाजगी सोसायटीत हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती ठाणे क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली. यावेळी घटनास्थळावरून पोलिसांच्या पथकाने 3 एजंटसह दोन अभिनेत्रींना अटक केली आहे.
ठाणे पोलिसांच्या क्राईम ब्रांच युनिट 1 ने एक मोठी कारवाई करत दोन अभिनेत्रींना अटक केली आहे. ज्या एका खाजगी सोसायटीत हे सेक्स रॅकेट चालवायच्या. बॉलिवूडशी संबंधीत या दोन्ही अभिनेत्री असून वेश्या व्यवसायाकरता या दोन्ही अभिनेत्री लाखो रुपये घ्यायच्या अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे. तर कोविड 19 च्या काळात चित्रिकरण बंद असल्याने या दोन्ही अभिनेत्री वेश्या व्यवसायाकडे वळाल्या असं देखील तसापात समोर आल आहे. धक्कादायक म्हणजे या सेक्स रॅकेटचीं लिंक मुंबईतील अनेक मोठ्या अभिनेत्रींशी असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी आता ठाणे क्राईम ब्रांच अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी करत आहेत. हे एक मोठं रॅकेट असल्याची पोलिसांना शंका आहे.







