तलवारीने केक कापणे बर्थ बॉयच्या चांगलेच अंगलट; वाढदिवसाच्या दिवशीच झाला गजाआड

खामगाव (प्रतिनिधी) – वाढदिवस साजरा करताना तलवारीने केक कापणे एका बर्थ बॉयच्या चांगलेच अंगलट आले. तलवारीने केक कापणे आणि नाचगाणे सुरू असतानाच शहर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याचवेळी त्याचे मित्र घटनास्थळावरून फरार झाल्याने, एकट्या बर्थडेबॉयवरच गजाआड होण्याची वेळ आली.

बाळापूर फैलातील सुदर्शन गेट जवळ रात्री उशीरा वाढदिवस साजरा केल्या जात आहे. याठिकाणी तलवारीने केक कापणे आणि नाचगाणे सुरू असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे शहर पोलिस घटनास्थळी धडकले असता रोहण संजय बामनेट (१८) रा. बाळापूर फैल, मनिष हट्टेल, जय धुंदलेकर, अनुराग महातो, अंजिक्य हवेलिया वाढदिवस साजरा करताना दिसून आले.

दरम्यान, पोलिसांना पाहून चौघांनी घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी शहर पोलिसांनी रोहण बामनेटसह चौघां विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५, भादंवि कलम १८८, २७९, २७०, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१(ब), साथरोग अधिनियम कलम ०३ आणि महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम १३५ अन्वये कारवाई करण्यात आली.शहर पोलिसांनी एकास अटक केली आहे. त्याच्यासह साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here