सरस्वती डेअरी व सरस्वती फोर्डचे संचालक मुकेशजी टेकवाणी यांचा जन्मदिवस उत्साहाने साजरा
जळगाव (संपादक सुनिल पाटील) – सद्यपरिस्थितीत कोरोना व्हायरसच्या थैमानामुळे जिल्हा प्रशासन हादरले आहे. जळगाव
जिल्ह्यात कोरोनाबाधितांनी दहा हजारांचा आकडा पार केला आहे. मात्र या आजाराचे गांभीर्य अजूनही बऱ्याच लोकांना समजत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्हा प्रशासन सोशल डिस्टसिंग आणि मास्कचा वापर करा, काळजी घ्या या विषयी घसा ओरडून सांगत आहे. जबाबदार नागरिक या सर्व गोष्टींचे पालन करीत आहे. मात्र काही बेजबाबदार लोकांमुळे कोरोनाचा आकडा वाढत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.
सरस्वती डेअरी व सरस्वती फोर्डचे संचालक मुकेशजी टेकवाणी यांचा वाढदिवस मित्र परिवार, कुटुंबिय आणि कर्मचाऱ्यांच्या मोठ्या संख्येने असलेल्या उपस्थितीत साजरा झाला. या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थितीचे नियम, मास्कचा वापर आणि सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. तसेच या कार्यक्रमाचे फोटो त्यांनी सोशल मिडीयावरदेखील शेअर केले आहेत. आज जळगाव शहरातील एक मान्यवर व जबाबदार व्यक्तींकडून ही गोष्ट झाल्याने, आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सोशल मिडीयावर टाकलेल्या पोस्टमध्ये कामात सातत्य ठेवा, मन आणि शरीर निरोगी राखण्यासाठी छानसा व्यायाम करा. परिश्रमाचे फळ हे नेहमीच चांगले मिळते.सकारात्मक विचार केल्यास, जीवनात स्फूर्ती येते, अशा आशयाचे अत्यंत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन श्री.टेकवाणी फोर्ड परिवाराला करतांना दिसत आहेत. मात्र आपल्याच आवाहनाला छायाचित्रातून हरताळ फासत असल्याचे दिसून येत आहेत.


दरम्यान या सर्व प्रकाराकडे मात्र जिल्हा प्रशासन व पोलिसांनी कानाडोळा केला असल्याचे दिसून येत आहे. मागे महिलांच्या किटी पार्टीवर कारवाई करण्यात जी तत्परता दाखवली ती या ठिकाणी का नाही? असा प्रश्न मात्र यातून उपस्थित होत आहे. या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सरस्वती फोर्डचे संचालक धवलजी टेकवाणी यांनी व संपूर्ण फोर्ड परिवाराने मुकेशजी टेकवाणी सरांना शुभेच्छा दिल्यात. यावेळी सरस्वती फोर्डच्या सी.ई.ओ. पल्लवी भोगे यांनासुध्दा वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.







