पुणे येथे वारजेत सब कॉन्ट्रॅक्टरवर अज्ञात हल्‍लेखोरांचा गोळीबार

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – सब कॉन्ट्रॅक्टरवर अज्ञात हल्‍लेखाोरांनी गोळीबार केल्‍याची घटना शनिवारी सकाळी वारजेतील डुक्कर खिंड परिसरात घडली. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी नाही. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात रविंद्र सखाराम तागूंदे यांनी फिर्याद दिली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गाोळीबाराची घटना पूर्ववैमनस्यातून की आर्थिक देवाणघेवाणीतून झाला, याचा पोलिस तपास करत आहेत. रविंद्र सखाराम तागूंदे (वय ३६, रा. वारजे माळवाडी ) असे या गोळीबारात बचावलेल्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की. रविंद्र तागूंदे हे सब कॉन्ट्रॅक्टर आहेत. चांदणी चौक येथील डुक्कर खिंड येथे वंडर फ्युचरा लगत मागील बाजूस प्लॉटींग सुरू आहे. तिथे ते सब कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्या प्लॉटींगला असलेल्या कंम्पाऊंड गेटजवळ तागूंदे त्यांच्या एका सहकारी सोबत उभे होते.

चानक चांदणी चौक येथून वारजेच्या दिशेने सेवा रस्त्यावरून जाणाऱ्या ज्युपीटर व होंडा युनीकॉर्न या दोन दुचाकी वरुण आलेल्या चार अज्ञातांकडून जवळपास चार गोळ्या तागूंदे यांच्या दिशेने झाडण्यात आल्या. त्यामधील एक गोळी तागूंदे यांच्या कानाजवळून गेली. ते थोडक्यात बचावले .फिर्यादी तागूंदे यांच्यावर अगोदरचे दोन गंभीर गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाली असल्याची माहिती मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here