पुणे (उपसंपादक वासंती देवळे) – स्पायनल मस्क्यूलर रेट्रोफी नावाच्या दुर्मिळ आजाराने पीडित अयांश गुप्ता या हैद्राबाद मधील लहान मुलाला उपचार करण्यासाठी लागणारे 16 कोटी रुपये दान शुरांच्या क्राउड फंडिंग द्वारे जमले असून आता परदेशातून आयात कराव्या लागणाऱ्या औषधावरील इंपोर्ट ड्यूटी ( आयात करात )सरकारने सूट दिली आहे.
ही इंपोर्ट ड्यूटी माफ करावी असे आवाहन देशातील अनेक संस्था व पुण्याच्या शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींनी केले होते. या मानवतावादी आवाहनाला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने १६ कोटी रुपयांचे हे औषध आयात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी चे संस्थापक राकेश मित्तल,संस्कार पब्लिक स्कुल च्या मुख्याध्यापक सिद्धी मित्तल यांनी पत्रकाद्वारे अयांशसाठी मदतीचे आणि नंतर इंपोर्ट ड्यूटी माफीचे आवाहन केले होते. अर्थमंत्र्यांच्या प्रतिसादानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

हैदराबादमध्ये दोन वर्षांच्या अयांश गुप्ता या चिमुकल्याला स्पायनल मस्क्युलर अॅट्रोफी नावाचा दुर्मिळ आजार झाला आहे. या आजारावरील उपचारासाठी पर देशात एकच औषध उपलब्ध आहे आणि या औषधाची किंमत तब्बल १६ कोटी रुपये इतकी आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबासाठी एवढी मोठी रक्कम जमा करणं कठीण होते..,तरीही त्यांनी सोशल मीडियावरून देखील देशातील अनेकांनी मदतीचे आवाहन करुन मदत मिळवली आहे,असे राकेश मित्तल आणि सिद्धी मित्तल यांनी सांगितले. या औषधाच्या आयात करात सूट मिळाल्याने लवकरात लवकर हे उपचार सुरू होतील आणि अयांश ला जीवदान देण्या साठीचे अनेकांचे प्रयत्न सफल होतील.






