पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – राज्यात तब्बल अडीच-तीन महिन्यांनंतर आजपासून (सोमवार दि. ७ ) लॉकडाऊन शिथील करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील जिल्ह्यांची पाच स्तरांमध्ये वर्गवारी केली आहे. त्यानुसार आज लॉकडाऊन उघडताच नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. पुणे – नगर महामार्गावर वाघोली येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचे आज पाहायला मिळाले.
पुणे – नगर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र सकाळी सात वाजल्या पासून पाहायला मिळाले.पुणे नगर रोडने वाघोली परिसरात नगररोडच्या दोन्ही साईटने वाहतूक कोंडी झाली होती.यामुळे वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. यामध्ये रुग्णवाहिका ही अडकल्याचे दिसून आले होते.
त्यातच वाघोलीच्या परिसरात महामार्गाचे काम चालू असून ठेकेदाराने अनेक ठिकाणी अर्धवट कामे केल्यामुळे याचाही फटका वाहन चालवताना बसला.






