पुणे पोलिसांनी केली दुचाकीचोरी करणाऱ्या सराईतांना अटक

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – शहरातील विविध भागातून दुचाकीचोरी आणि मोबाईलचोरी करणाऱ्या सराईतांना दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केले. त्यांच्याकडून वाहनचोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. त्याशिवाय 64 हजार रूपये किंमतीचे आठ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. प्रशांत मधुकर भोसले (वय 20) हसन इक्बाल शेख (वय 20) आणि अभिषेक विलास पाडुळे (वय 21) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलीस निरीक्षक सुनिल पंधरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथक हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी चोरीच्या दुचाकींची विक्री करणाऱ्यांची माहिती पोलीस नाईक शिवाजी जाधव आणि मनोज खरपुडे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सासवड रस्त्यावरील काळेपडळमध्ये तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी 5 वाहनचोरी आणि मोबाईल चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक सुनिल पंधरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाडवी, पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप, बुवा कांबळे, उदय काळभोर, दिनकर लोखंडे, राजेश अभंगे, विनायक रामाणे, मनोज शिंदे, राजेश लोखंडे, शिवाजी जाधव, मनोज खरपुडे, अमोल सरतापे, संभाजी गंगावणे यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here