पेझारी आंबेपूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शैलेश पाटील मनगटात शिवबंधन बांधणार
अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) – पेझारी लगत असलेल्या आंबेपूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य शैलेश पाटील यांचा येत्या १० जून २०२१ रोजी मा. आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश होत आहे.
शेतकरी कामगार पक्षाचा पोयनाड ते सांबरी हा एकेकाळी बालेकिल्ला मानला जात होता. गेल्या सात आठ वर्षापासून विद्यमान आमदार महेंद्रशेठ दळवी व शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी यांनी या विभागात आणलेली विकासाची गंगा तसेच कुर्डूस जिल्हा परिषद मतदार संघात शिवसेनेची होत असलेली घोडदौड यामुले शिवसेना पक्षावर विश्वास ठेवून श्री शैलेश पाटील हे गेली पंचवीस वर्ष शेतकरी कामगार पक्षाचे प्रमाणिक पणे काम करत होते. त्यांनी प्रत्येक वाडीत व घरातील तळागाळातील माणसांपर्यंत जाऊन जनसंपर्क ठेवला स्वतःचा स्वार्थ न पाहता आर्थिक झिज सोसून लोकांची सेवा करताना पक्ष वाढविण्याचे काम केले परंतु शेका पक्षाच्या नेत्यांनी याची दखल न घेता कायम अपमानास्पद वागणूक दिली गेले अनेक महिने पक्षात त्यांची घुट मट होत होती त्यामुळे एखादा प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्त्याला पक्षश्रेष्ठींकडून अशी वागणूक मिळाल्यामुळे शैलेश पाटील यांच्या समर्थकांत चलबिचल सुरू होती
अंबेपुर ग्रामपंचायतीत बेकायदेशीर कामाला विरोध केल्यामुळे शेकाप नेत्यांकडून सतत अपमानास्पद वागणूक मिळत असल्यामुळे श्री शैलेश पाटील यांनी आपला स्वाभिमान गहाण न ठेवता शेकापला रामराम करीत माननीय आमदार श्री महेंद्र शेठ दळवी व शिवसेना तालुका प्रमुख श्री राजा केणी यांनी केलेल्या विकास कामांचा झंझावात पाहून आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून गुरुवार दिनांक १0 जून २०२१ रोजी माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या उपस्थितीत आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे शिवसेना या विभागात आणखीन मजबूत होऊन पक्ष वाढीस निश्चित मदत होणार आहे. यामुळे येत्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचे पारडे विजयाकडे झुकणार हे नक्की.






